मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी या घरची' मधून घराघरापर्यंत पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर. शशांक केतकर कायमच चर्चेत राहिला आहे. शशांक केतकर कधी आपल्या कामामुळे तर कधी आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आजही तसंच खास कारण आहे. शशांक केतकरने आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी शेअख केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने आपल्या चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. शशांक केतकर लवकरच बाबा होणार आहे. शशांक केतकरने पत्नी प्रियंका केतकरचा बेबी बंपसह फोटो शेअर करत गोड बातमी दिली आहे. शशांकचं प्रियंकासोबतचा हा दुसरा विवाह आहे. 



नाताळचं औचित्य साधून शशांक आणि प्रियंकाने ही गोड बातमी शेअर केली आहे. 'आम्हाला हे माहिती होतं की, सॅन्टा येतो आणि गिफ्ट्सचा वर्षाव करतो. आम्हाला हे माहित नव्हतं की, आम्हालाही एक छान गिफ्ट मिळे. या गिफ्टसाठी आभारी आहोत. आम्हा तिघांकडूनही हॉलिडे सीझनच्या शुभेच्छा'.असं शशांकनं त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.



‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला 'श्री' अर्थात, शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांनी २०१७मध्ये पुण्यात लग्न केलं. व्यवसायानं वकील असलेली प्रियांका आणि शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. २०१७मध्येच एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. 'होणार सून मी या घरची' मालिकेत त्याच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानसोबत दोन वर्षांपूर्वी शशांकचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच ते दोघे वेगळे झाले होते.