मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा  (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Good News for the fans of Priyanka Chopra and Nick Jonas) दोघेही आई-वडील झाले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही माहिती दिली आहे. मुलाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. मात्र, त्यांना मुलगा झाला की मुलगी हे अद्याप समोर आलेले नाही.


प्रियंकाने स्वतः दिली चाहत्यांना खुशखबर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही सरोगसीद्वारे मुलाचे स्वागत केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयतेसाठी आदरपूर्वक आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. निक जोनास यानेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या खास प्रसंगी प्रियंका आणि निक जोनास यांचे बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी अभिनंदन करत आहेत.



कुटुंब वाढवण्याचे दिले होते संकेत


नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाने पती निक जोनास याच्यासोबत संसार वाढवण्याचे संकेत दिले होते. तिने एका मासिकाशी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, भविष्यात मूल माझ्या आणि निकच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असेल. आणि जेव्हा मी कुटुंबासोबत पुढे जाण्याचा विचार करेन, तेव्हा मला आयुष्यात थोडे हळूहळू पुढे जायला आवडेल. मात्र, ती इतक्या लवकर आई होईल, असे कोणालाच वाटले नव्हते.


2018 मध्ये या प्रियंकाचे लग्न 


प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये निक जोनास याच्याशी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते. यानंतर दोघांनी आपले नाते पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर प्रियंका चोप्रा  पती निकसोबत अमेरिकेत राहत आहे.


आडनाव हटविण्यावरुन संभ्रम 


प्रियंका चोप्रा हिने गेल्यावर्षी तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून तिच्या पतीचे निकचे आडनाव जोनास काढून टाकले होते, ज्यामुळे बराच गोंधळ झाला होता. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून दोघे घटस्फोट घेणार आहेत अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.