मुंबई : बांग्ला सिनेसृष्टीची अभिनेत्री आणि टीएमसीच्या चर्चेत असलेल्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाळाला  जन्म देणार आहेत. त्यासाठी त्यांना येत्या एक ते दोन दिवसांमध्ये रूग्णालयात दाखल केलं जावू शकतं. तत्पूर्वी बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अफवा पसरली होती. नुसरत जहां त्यांच्या  बाळाच्या प्रतीक्षेत आहे. आनंद बाझार पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, डिलिव्हरी दरम्यान यश दासगुप्ताला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती नुसरत जहां यांनी डॉक्टरांकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्स नुसार नुसरत जहां अभिनेता आणि मॉडेल यश दासगुप्ता सोबत रिलेशनशिप मध्ये आहे.  लग्नानंतर नुसरत यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान नुसरत जाहाँ सहकलाकार अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याचं अनेकदा समोर आलं. आता नुसरत जाहां बाळाला जन्म देणार आहेत.


19 जून रोजी तुर्कीमध्ये व्यावसायिक निखिल जैन आणि नुसरत यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. 


विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.