मुंबई: गूगल नेहमी दिग्गज व्यक्तींच्या कामगिरीला आठवणीत ठेवत डूडलच्या माध्यमातून खास व्यक्तींच्या कामाला मानवंदना देत असतो. आज गूगलने डूडलच्या माध्यमातून फ्रांसचे अभिनेते आणि कथालेखक मोलिरे यांना मानवंदना दिली आहे. गूगल डूडलवर  मोलिरे यांच्या 'स्कूल फॉर वाइव्ज , 'डॉन युआन , 'द माइजर' आणि 'द इमॅजनरी इनवैलिड' यांसारख्या नाटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोलिरे यांना फ्रांस मधील शेक्सपियर सुद्धा संबोधले जात असे.




मोलिरे यांचे वडील व्यवसायाने सूतार होते त्यांना परंपरागत व्यवसायाची आवड नव्हती आणि त्यांनी व्यवसाय करण्यास स्पष्ट नकार दिला होता. 1640 साली त्यांनी रंगमंचाच्या दुनीयेत पाय ठेवण्याचा निर्णय घेतला. मोनिरे यांचे नाटक हे फक्त रंगमंचासाठीच आहेत हे त्याचे ठाम मत होते. 
मोलिरे यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग पॅरिस येथे झाला होता. 1660 साली 'द अफेक्टेड यंग लेडीज' नाटकाचा प्रयोग झाला होता.मोलिरे नेहमी नाटकात व्यग्र असायचे. 'द इमॅजनरी इनवैलिड' हे त्यांचे आखेरचे नाटक होते आणि या नाटकाचा पहिला प्रयोग आज संपन्न झाला होता. मोलिरे यांचा जन्म 5 जानेवारी 1622 रोजी झाला होता.