बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांच्यावर गुगलने बनवले डूडल
कदाचीत आजच्या पिढीतील अनेकांना फारुख शेख यांच्याबाबत फारशी माहिती नसेल. पण, ज्यांनी `चश्मे बहाद्दूर` चित्रपट पाहिला असेल त्यांना लगेच शेख यांची प्रतिमा आठवेल.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांना इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहीली आहे. आज (२५ मार्च २०१८) त्यांचा ७०वी जयंती आहे. जयंतीनिमित्ताने गुगलने फारूख शेख यांचे शानदार डुडल बनवले आहे. कदाचीत आजच्या पिढीतील अनेकांना फारुख शेख यांच्याबाबत फारशी माहिती नसेल. पण, ज्यांनी 'चश्मे बहाद्दूर' चित्रपट पाहिला असेल त्यांना लगेच शेख यांची प्रतिमा आठवेल.
वादात न अडकलेला कलाकार
फारूख शेख यांनी बॉलिवूडमधील एक काळ चांगलाच गाजवला आहे. ९०च्या दशकात त्यांनी चित्रत्रपटांमधून कामे करणे कमी केले. पण, त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा टीव्ही मालिकांकडे वळवला. फारूख शेख हे बॉलिवूड आणि टीव्हीवरचे एक असे कलाकार ठरले जे कधी कोणत्या वादात आडकले नाहीत. गुजरात येथील अमरोली येथे २५ मार्च १९४८मध्ये जन्मलेल्या फारूख यांना त्याच्यासह पाच बाहू, बहिण होते. त्यात ते सर्वात मोठे होते. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वकिलातीत त्यांची चांगली ओळख होती. पण, अभिनयाच्या वेडापाई त्यांनी वकिलातीतील काम सेडले आणि अभिनयात करिअर करायचे ठरवले.
पहिल्या चित्रपटात केले फुकट काम
फारूख शेख यांचे वैशिष्ट्य असे की, १९७३मध्ये आलेल्या गर्म हवा या पहिल्या चित्रपटात त्यांनी एकही पैसा न घेत मोफत काम केले. रमेश सथ्यू चित्रपट बनवत होते. मात्र, त्यासाठी ते अशा अभिनेत्याच्या शोधात होते. जो एकही पैसा घेणार नाही आणि कामासाठी तयार होईल. रमेश सथ्यू यांचा शोध फारूख शेख यांच्याजवळ थांबला आणि गर्म हवाचे शुटींग झाले. त्यातही शेख मजेशीर असे की, गर्म हवासाठी शेख यांना ७५० रूपये मानधन मिळाले. पण, चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे उलटल्यावर.
उमराव जान चित्रपटाने दिली ओळख
दरम्यान, गर्म हवानंतर शेख यांनी अनेक छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये कामे केली. मात्र, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती 'उमराव जान'नेच. खरे तर, उमरान जाववरती रेखाची पूर्ण छाप होती. मात्र, फारूख शेक यांनी आपल्या भूमिकेला इतका न्याय दिला की, त्यातही त्यांच्या अभिनयाचे कौतूक झाले. तिथून त्यांना अनेक उत्तमोत्तम चित्रपट मिळत गेले. त्यांच्या अभिनयाचे उत्तरोत्तर कौतुकही होत गेले.