मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी आपल्या डान्सच्या अदांनी अनेकांना घायळ करते. तिच्या अदांवर चाहते पुरते फिदा आहेत. सपना चौधरी सोशल मीडियावरही खूप प्रसिद्धी झोतात आली. आता मात्र सपनाचा मीटर डाऊन करण्यासाठी आणि तिला टक्कर देण्यासाठी एक सौंदर्यवती आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपनापेक्षाही ही दिसायला सुंदर असल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे. सध्या या डान्सरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या डान्सरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 


कोणी म्हणतं ती हरियाणवी आहे तर कोणी म्हणतं राजस्थानी सध्या तिचीच हवा सगळीकडे आहे. गोरी नागोरी असं तिचं नाव आहे. सोशल मीडियावर ती खूप जास्त अॅक्टिव्ह असते. रिल्स, फोटो आणि डान्सचे व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. 


गोरीला लहानपणापासून डान्स खूप आवडायचा. तिने मॉडेलिंग आणि डान्समध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिला राजस्थानी गाणं 'ले फोटो ले' या गाण्याने खूप जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. 11 कोटींहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. 


गोरी नागोरीचा जन्म राजस्थान जिल्ह्यातील नागौर या गावात झाला होता. तिने वयाच्या 9 व्या वर्षापासून डान्स करायला सुरुवात केली. तिला शकीरा खूप जास्त आवडते. गोरीची तुलना आता हरियाणवी क्वीन सपना चौधरीशी केली जात आहे. राजस्थानी गाण्याने तिला प्रसिद्धीझोतात आणलं.