नवी दिल्ली : टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस-१०' चा स्पर्धक असलेला अभिनेता गौरव चोप्रा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता गौरव चोप्राने गुपचुप लग्न उरकलं आहे. गौरवने हितीशासोबत लग्न केलं आहे. लग्नासंदर्भात अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. 


अभिनेता गौरव चोप्रा आणि हितिशा यांच्या विवाहसोहळ्यात दोघांचेही कुटुंबिय तसेच जवळील मित्र परिवार उपस्थित होता.


गौरव टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा स्टार आहे आणि त्याने आपल्या लग्नात कुठल्याच सेलिब्रेटीला आमंत्रण दिलं नव्हतं. 'बिग बॉस १०' मध्ये सहभागी झालेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल या दोघांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.


लग्नसोहळा पार पडल्यानंतर स्वत: गौरव चौप्राने आपल्या लग्नाचा माहिती एका पोस्टद्वारे दिली आहे. गौरव चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गौरव शेरवानीत दिसत आहे. ही पोस्ट करताना गौरवने चाहत्यांना म्हटलंय की, 'तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असाच राहू द्या.'



लग्नसोहळ्यातील विधी दरम्यान हितिशाने लाल रंगाचा लहेंगा आणि गोल्ड ज्वेलरी घातली होती. तर, गौरवने व्हाईट कलरची शेरवानी परिधान केली होती.


गौरव चोप्रा सिरियल 'उत्तरन', 'साडा हक' आणि 'ऐसा देस है मेरा' सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये पहायला मिळाला होता. गौरव चोप्रा बिग बॉसच्या घरातही स्पर्धक होता यावेळी सलमान खाननेही गौरवचं कौतुक केलं होतं.