Actress Spotted in a Hotel Room with Actor  : चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या अफेयरच्या चर्चा सुरु असणं ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करण्या दरम्यान, दोघांमधील जवळीक वाढणं आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये येणं ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. अनेकवेळा अफेयरच्या या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरतात तर अनेकदा या फक्त अफवाह ठरल्या आहेत. मात्र, अनेकदा या सगळ्या अफवा इतक्या वाढतात की त्याचा परिणाम या सेलिब्रिटींच्या खासी आयुष्यावर होतो. 90 च्या दशकात एक अशीच अफवा सुरु होती त्याचा परिणाम हा गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यावर झाला. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की त्याचं पत्नी सुनीतासोबतचं नात्यात संकटात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि गोविंदामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. 90 च्या दशकात गोविंदाचं स्टारडम हे यशाच्या शिखरावर होतं. त्यामुळे सगळ्यात जास्त चर्चा ही त्याच्याविषयी सुरु असायची. रानी मुखर्जी आणि गोविंदाच्या जोडीनं सुपरहिट चित्रपट दिले.  या दोघांची जोडी ही 90 च्या दशकात गाजलेली होती. इतकंच नाही तर चित्रपट निर्मात्यांची देखील या दोघांची जोडी ही सगळ्यात आधी चर्चेत असते. 


गोविंदा यांनी 1987 मध्ये सुनीता आहूजाशी लग्न केलं होतं. त्यांचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी देखील त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कुठे तरी अफवा घर करु लागल्या होत्या. गोविंदाविषयी अनेक अफवा येऊ लागल्या होत्या. त्याचं नाव हे त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. त्यामुळे त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. या हीरोंविषय हे देखील म्हटलं जाऊ लागलं की हा आरोप त्याच्यासोबत 'इल्जाम' या चित्रपटात दिसलेली नीलम कोठारेनं सुरु केल्या होत्या. 


गोविंदा आणि रानी मुखर्जीची भेट 'हद कर दी आपने' च्या शूटिंगवेळी झाली होती. स्वित्झर्लंड आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं. त्या दरम्यान, त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर ते सतत एकत्र स्पॉट होऊ लागले होते. या दरम्यान, त्यांच्या डेटिंगरट्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दरम्यान, असं म्हटलं जातं की एक पत्रकार राणीला भेटण्यासाठी गेलो होता तेव्हा त्यानं पाहिलं की गोविंदा राणी मुखर्जीच्या रूममधून नाईट सूटमध्ये बाहेर पडला. इथूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर सुनीता यांना मोठा धक्का बसला होता. 


राणी मुखर्जीनं दिली होती प्रतिक्रिया


या प्रकरणानंतर राणी मुखर्जीनं धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं म्हटलं होतं की जर कोणत्या अभिनेत्रीनं गोविंदासोबत तीन-चार चित्रपटांमध्ये काम केलं तर मीडिया लगेच असं समजतं की तिचं गोविंदासोबत जोडण्यात येतं. माझ्या माहितीनुसार, गोविंदासारखा चांगला मित्र आणि मजेशीर व्यक्तीला शोधणं खूप कठीण आहे. खरंतर, हॉटेलच्या रुममध्ये असलेल्या सगळ्या बातमीवर तिनं नकार दिला नाही. त्यामुळे अफवा आणखी वाढल्या. या मुलाखतीनंतर सुनीता या गोविंदाला सोडून त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. त्यानंतर, गोविंदा आणि सुनीता यांनी त्यांच्यातील हे मतभेद दूर केले आणि ते दोघं आता आनंदी आयुष्य जगत आहेत.