गोविंदाला या एक्ट्रेसशी झाले प्रेम, घटस्फोट होता होता वाचला
अशी एक कहाणी सुरू झाली ज्यामूळे त्याचा घटस्फोट होणार होता.
मुंबई : सुपरस्टार गोविंदा आज आपला ५४ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. एक काळ त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
त्याच्या आयुष्याशीही अनेक कहाण्या जोडल्या गेल्या आहेत. त्यात अशी एक कहाणी सुरू झाली ज्यामूळे त्याचा घटस्फोट होणार होता.
प्रेम सुरू
सर्व काही ठिक चालले असताना त्याच्या आयुष्यात प्रेम आलं. राणी मुखर्जीच्या मागे तो अक्षरश: वेडा झाला.
२००० साली राणी आणि गोविदा 'हद कर दी आपने' मध्ये एकत्र काम करत होते. या सिनेमामुळे ते दोघे एकमेकांच्या जास्त जवळ आले.
राणीचेदेखील गोविंदावर खूप प्रेम होते तर गोविंदाही राणीसाठी खूप पैसा खर्च करत असे.
घट्ट नाते
त्याने राणीला केवळ महागडे गिफ्ट्च नाही तर सिनेमा मिळण्यासाठी प्रोड्यूसर, निर्मात्यांशी बोलणीदेखील केली. राणी इंडस्ट्रीत आपले पाऊल रोवत होती त्यावेळी ते दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ राहत असत.
घटस्फोट ?
त्या दोघांना एका फ्लॅटमध्ये एकत्र पाहिले गेल्याच्याही बातम्या समोर आल्या. त्यानंतर त्यांचे अफेअर सर्वांसमोर आले.
हे प्रकरण गोविंदाची पत्नी सुनीता पर्यंत पोहोचले. त्यांचे नाते तुटण्यापर्यंत वेळ आली होती. पण आपल्या पत्नीला सोडू शकत नाही या निर्णयावर गोविंदा ठाम राहिला.
गोविंदा आणि राणीचे नाते इथेच संपुष्टात आले.
गोविंदा-रवीना कनेक्शन
केवळ राणीच नव्हे तर रवीना टंडन सोबतही त्याचे नाव जोडले गेले. राणी प्रमाणेच गोविंदाने रवीनासोबतही खूप साऱ्या सिनेमात काम केले.
त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा सगळीकडेच होत राहिली. पण गोविंदा आणि रविनाचे कनेक्शनही जास्त काळ टिकले नाही.