मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाह तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. कश्मीरा शाह सोशल मीडियावर नेहमी खूप सक्रिय असते. आणि तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते. कश्मिरा शाहचा असाच एक बोल्ड व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पूल साईडला अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टू पीसमध्ये अभिनेत्री 
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कश्मिरा शाह पूलसाइड टू पीसमध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीच्या मनात एक वाईट गोष्ट येते आणि ती पूलजवळ उभ्या असलेल्या तिच्या एका मित्राला पाण्यात ढकलते आणि त्याला पाण्यात टाकल्यानंतर खूप आनंदी दिसते. कश्मिराने नुकताच तिचा हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कश्मीरा शाह आहे गोविंदाची सून आहे
कश्मिरा शाह ही गोविंदाचा मुलगा कृष्णा अभिषेकची पत्नी आहे. कश्मिरा शाहच्या लेटेस्ट व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री व्हिडिओत बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. यासोबतच कश्मिराने कलरफुल श्रग आणि हाय हील्सची जोडी केली आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.