Ragini Khanna apologises for converting into Christianity : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंगचं लग्न चांगलंच चर्चेत होतं. आता गोविंदाची दुसरी भाची रागिनी खन्ना चर्चेत आली आहे. रागिनी खन्ना ही बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीपासून लांब आहे. त्यात बऱ्याच काळानंतर रागिनी ही आरती सिंगच्या लग्नाच्या निमित्तानं चर्चेत आली होती. तर या सगळ्यात तिच्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की तिनं हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला आहे. त्यानंतर तिनं एक पोस्ट शेअर करत सांगितलं की ती कट्टर हिंदू सनातनी आहे आणि मागच्या रीलसाठी ती माफी मागते. तर त्याशिवाय तिच्या सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या पोस्ट समोर येत आहेत. तिनं नक्की अशा पोस्ट का केल्या याविषयी सगळ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रागिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात तिनं म्हटलं होतं की यापुढे ती ख्रिश्चन धर्माच्या परंपरेचं पालन करेल. दरम्यान, त्याच्या 24 तासात रागिनीनं ती पोस्ट डिलीट करत माफी मागितली आहे. त्यावेळी तिनं एका या पोस्टमध्ये लिहिलं आहे की मी माझ्या आधीच्या रीलसाठी ज्यात मी ख्रिश्चन धर्म स्विकारण्याविषयी बोलले होते त्यासाठी मी माफी मागते. मी माझ्या मुळ धर्माकडे परत आली आहे, कट्टर सनातनी हिंदू मार्ग मी निवडला आहे. त्यामुळे मी मागिल पोस्ट डिलीट करते. 



या पोस्टसोबत फोटोशॉप फोटो देखील समोर आला आहे ज्यात तिचा चेहरा आणि एका धर्मगुरु देखील दिसत आहे. हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे. रागिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशा काही पोस्ट आहे ज्या पासून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्याचं कारण म्हणजे रागिनीच्या पोस्टवर वेगवेगळ्या लोकांचे व्हिडीओ देखील शेअर करण्यात येत आहेत. इतकंच नाही तर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून वेगवेगळ्या लोकांचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. त्यामुळे असा अंदाज बांधण्यात येत आहे की रागिनीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे हॅक झालं आहे. दरम्यान, अजून या प्रकरणात रागिनीची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ती लवकरच काही प्रतिक्रिया देईल अशी आशा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.