नवी दिल्ली : अभिनेता गोविंदा आपल्या 'फ्राई डे' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या कलाकारांसोबत काम करणे गोविंदाला भावते. मंगळवारी गोविंदाने एक फोटो शेअर केला. ज्यात अभिनेता वरुण शर्मा, दिग्दर्शक अभिषेक डोगरा आणि 'फ्राई डे' चित्रपटाचा क्लप बोर्ड दिसत आहे. फोटो शेअर करताना पोस्टमध्ये त्याने लिहिले की, " दिग्दर्शक, फिल्म निर्माता, अभिनेता आणि टेक्निशन्सच्या नव्या पिढीसोबत काम करणे चांगले आहे.  'फ्राई डे', अभिषेक डोगरा, वरुण शर्मा."



त्याचबरोबर वरुणने लिहिले की, "गोविंदा सरांसोबत काम करण्याचा अनुभव शानदार होता. हे 'फ्राई डे' आहे. अभिषेक डोगरा ही हास्य पसरवण्याची वेळ आहे." हा वरुणचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी २०४५ मध्ये 'डॉली की डोली' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. यात सोनम कपूर, पुलकित सम्राट, मोहम्मद जीशान अयूब आणि राजकुमार राव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लवकरच वरुण 'फुकरे 2' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होईल.