मुंबई : दिग्दर्शक अनुराग बासू यांचा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, त्याआधीच वाद काही या सिनेमाची पाठ सोडण्यास तयार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात अभिनेता गोविंदा एक छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात होतं... या सिनेमाशी निगडीत गोविंदाचा एक फोटोही वायरल झाला होता. त्याची बरीच चर्चाही झाली. परंतु, लवकरच खुद्द दिग्दर्शकांनीच गोविंदाचे सीन्स या सिनेमातून काढून टाकण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं. 


परंतु, दिग्दर्शकांचा हा निर्णय गोविंदाला मात्र काही पटलेला दिसत नाहीय. आपली नाराजी गोविंदानं सोशल मीडियावर जाहीरपणे व्यक्त केलीय. 


आपण या सिनेमात काम केलं कारण केवळ माझे सिनिअर ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीरचा हा सिनेमा होता. कोणत्याही सायनिंग अमाऊंट आणि कॉन्ट्रक्टशिवाय आपण साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन स्क्रिप्ट ऐकली आणि 
शूट केलं. परंतु, यानंतरही माझ्याविषयी अनेक नकारार्थी बातम्या येत राहिल्या, असं गोविंदा यांनी आपल्या ट्वटसमध्ये म्हटलंय.





उल्लेखनीय म्हणजे, तब्बल तीन वर्ष हा चित्रपट रेंगाळल्यानंतर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय.