मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतली बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायची आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा  (Bollywood Actress) बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते या फोटोत दिसणारी ही गोंडस मुलगी कोण आहे याचा अंदाज लावण्यात व्यस्त आहेत.


हे ही वाचा : उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo 


फोटोत काय?


सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा ब्लॅक अँड वाईट फोटो समोर आला आहे. या फोटोत मुलीने तिचे दोन्ही ओठ दाबून ठेवले. आणि ती खुपच क्युट दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress)  ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल एक क्लू देतो, यावरून तरी तुम्हाला ओळखता येईल. 


हे ही वाचा : ''मेरा बचपन कहा गया?'',मराठी पोट्टीने पुन्हा गाजवला रॅपरचा स्टेज


ही आहे 'ती' अभिनेत्री?


बॉलिवूड अभिनेत्रीने (Bollywood Actress) बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम केले आहे. यासोबतच ती तिच्या क्यूट स्माईल आणि बबली स्टाइलसाठीही ओळखली जाते. ही दुसरी कोणी नसून बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक जुही चावला (juhi chawla) आहे. जुही चावलाने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही जुही अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 


हे ही वाचा : फोटोत लपलेला चुकीचा फासा ओळखून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 


जुही चावलाच्या (juhi chawla) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ती हुश हुश्श या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरीजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सहाना गोस्वामी, सोहा अली खान, आयशा जुल्का, करिश्मा तन्ना आणि कृतिका कामराही तिच्यासोबत दिसल्या आहेत. ही तिची वेबसीरीज प्रेक्षकांना आवडली आहे.