Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress)तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा आगामी चित्रपटातील नवीन लुक आहे. या लुकवरून तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखायचे आहे. 


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत तुम्ही पाहू शकता, अभिनेत्रीचा हा आगामी सिनेमातील लुक आहे. या लुकमध्ये ती खुपच वेगळी दिसत आहे. अशाप्रकारच्या भूमिकेत अथवा लुकमध्ये ती प्रथमच दिसली आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कोण आहे? हे तुम्हाला ओळखायचे आहे


कोण आहे ही अभिनेत्री? 


बॉलिवूड अभिनेत्रीने  (Bollywood Actress) स्वत:च्या हिंमतीवर सिनेमे गाजवले आहेत. तिचा अभिनय खुप चांगला आहे. तसेच ती सोशल मीडियावर स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. या तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. आता तरी तुम्हाला हि अभिनेत्री ओळखता आली असेलच, जर अजूनही तुम्ही ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवू़ड अभिनेत्री कंगणा राणौत (kangana ranaut) आहे.  


दरम्यान ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कंगना राणौत आहे.  कंगना राणौत (kangana ranaut) बॉलिवूडमध्ये 'क्वीन' आणि 'पंगा क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे. तिने अनेक सिनेमात काम केले आहे. हे सिनेमे तिने तिच्या एकटीच्या बळावर गाजवले आहेत.तसेच कंगणा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. या तिच्या सवयीमुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. 


सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग करत होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे.


दरम्यान या फोटोतील कंगणा राणौत (kangana ranaut) अनेक चाहत्यांना ओळखता आली नाही आहे. तर अनेकांनी तिला अचूक ओळखली आहे.