Guess Who : फोटोतल्या `या` बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
हा फोटो एका अभिनेत्याच्या तरूणपणातला आहे. या फोटोमध्ये तरूणाला मिश्या आहेत. तसेच त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. आणि कॅमेरासमोर हा तरूण हसताना दिसत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा हा तरूणपणातला हा फोटो आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखता येतोय का पाहा.
फोटोत काय?
हा फोटो एका अभिनेत्याच्या तरूणपणातला आहे. या फोटोमध्ये तरूणाला मिश्या आहेत. तसेच त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. आणि कॅमेरासमोर हा तरूण हसताना दिसत आहे. या अभिनेत्याने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. बॉलिवूडचा एक काळ त्यांनी गाजवला आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते त्यांचा खुप आदर करतात.
'हा' आहे अभिनेता?
फोटोत दिसणारी ही व्यक्ती खुप मोठी आहे. आज इतकं वय झालंय तरी ही व्यक्ती काम करतेय. चित्रपट नसेल तर अनेक शो करतेय. तुम्हाला अजूनही ओळखता आले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून शहनशाह म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आहे. हा फोटो त्याच्या 'रेश्मा और शेरा' चित्रपटातील आहे. या चित्रपटात ते छोटूच्या भूमिकेत दिसले होते.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आहेत. 'पा' चित्रपटातील मुलाची, 'झुंड'मधील प्रशिक्षकाची आणि 'पिंक'मधील वकिलाच्या प्रत्येक पात्राने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. त्यांनी सिनेमांचा एक काळ गाजवला आहे.