Manisha Koirala Childhood Photos: अनेकदा अभिनेत्रींचे लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांचे फोटो व्हायरल झाले की, त्यांना ओळखणंही मुश्किल होऊन जाते. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. परंतु एकेकाळी या अभिनेत्रीला माधुरी दीक्षितची डुप्लिकेट असं म्हटलं गेले होते. या लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो मात्र सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. एकेकाळी या अभिनेत्रीला अनलकी असे संबोधले गेले होते. परंतु आज हिचं अभिनेत्री मोठी सुपरस्टार आहे. काहीच वर्षांपुर्वी आलेल्या 'लस्ट स्टोरी' मध्ये ती दिसली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती मनीषा कोईराला आहे. तिच्या लहानपणीच्या फोटोवरून तुम्ही तिला ओळखू शकाल का? हो, तुमचीही अशीच काहीतरी अवस्था झाली असेलच. लहानपणापासून ती अत्यंत गोंडस दिसत होती. आजही ती फारच सुंदर दिसते आहे. 90 च्या दशकात तिच्या अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेतही फार मोठी वाढ झाली होती. तिच्या अभिनयाचे सर्वच जण फॅन्स होते. आजही आहेत. मनीषा कोईराला ही मुळची नेपाळची आहे. परंतु भारतात येऊन तिनं आपलं स्वत:चं असं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आजही ती तितकीच लोकप्रिय आहे. 'संजू' या चित्रपटातून तिनं ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांची भुमिका केली होती. 


सौदागर या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या अभिनयाचे सगळेच जण फॅन्स झाले होते. त्यानंतर 1942 : Love Story हाही तिचा फार गाजलेला चित्रपट होता त्यामुळे तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटांतून काम केली. मध्यंतरी एका गंभीर आजाराशीही तिला सामना करावा लागला होता. त्यातूनही ती बाहेर आली आणि तिनं जोरदार कमबॅक केला. 


हेही वाचा - 'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांवरील सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल 


सध्या अशाच लोकप्रिय अभिनेत्रींचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायर होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते. मनिषा कोईराया सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु ती अनेकदा ओटीटीवरही दिसते. सोशल मीडियावरही तिचीच चर्चा असते. सध्या तिच्या या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.