मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांची कायम नजर असते. ते काय करतायेत, कुठे आहेत. काय नविन करतायेत हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडिओ समोर आल्यावर चाहत्यांना चॅलेंज दिलं जात आहे. व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत कुत्र्यासोबत दिसली अभिनेत्री
या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक अभिनेत्री एका कुत्र्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओच एक्ट्रेस पाठमोरी दिसत आहे. अभिनेत्रीकडे पूडल ब्रीड (Poodle Breed) या प्रजातीचा कुत्रा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र नेमकी ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यानंतर या अभिनेत्री ओळखण्याचा ट्रेंण्ड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे.


हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या अभिनेत्रीला चुकीचं Guess केलं आहे. काहिंनी या अभिनेत्रीला कतरिना कैफ म्हणून संबोधलं आहे. मात्र नेटकऱ्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आहे. आपण पाहू शकतो की, या व्हिडिओत अभिनेत्रीने ब्लॅक रंगाचा टाईट जिम वियर परिधान केला आहे. जो भरपूर स्टाईलिस्ट आहे. तर दुसरीकडे काही लोकं जॉर्जिया एंड्रियानीच्या बोल्ड फोटोची वाट पाहत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जॉर्जिया अरबाज खानची गर्लफ्रेंड आहे.
अनेकवेळा अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी एकत्र स्पॉट होत असतात. अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांचं नातं अनेकदा चर्चेत असतं.  मलायका अरोराचा नवीन शो मूव्हिंग इन विथ मलायका रिलीज होत असतानाही त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.


मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जियामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. जॉर्जिया जेव्हा फोटो शेअर करते की तेव्हा काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात.