तुम्ही ओळखलं का? बाल्कनीत उभी असलेली ही क्यूट चिमुकली ठरली नंबर 1 अभिनेत्री
अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मुंबई : अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकं त्यांना ओळखण्याचा बराच प्रयत्नही करतात. पण काही यशस्वी होतात तर काहींना ओळखणं कठिण जातं. आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक फोटो घेऊन आलो आहोत. जो पाहून तुम्हाला ओळखायचं आहे की, दिलेला हा कोणत्या सेलिब्रिटीचा आहे.
चला तर मग तुम्ही तुमची बुद्धीचा वापर करा, मनोरंजन विश्वातील सर्व ज्ञान गोळा करा आणि ओळखा की बाल्कनीजवळ उभी असलेली ही गोंडस मुलगी आहे तरी कोण? मात्र, या मुलाच्या निरागस चेहऱ्यावर तुम्ही अजिबात जाऊ नका, कारण आज ही मुलगी खूप प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.
चला तर मग आता आम्ही तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो. ही मुलगी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसंच तिची धाकटी बहीण देखील सिनेइंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तुमचा संयम न तोडता आम्ही तुम्हाला सांगतो की, बाल्कनीत उभी असलेली ही सुंदर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून करिश्मा कपूर आहे. जिला लोकं प्रेमाने लोलो म्हणतात. करिश्मा कपूरचा हा फोटो करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
करिश्मा कपूरच्या या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. लहानपणीही करिश्मा किती क्यूट दिसायची हे पाहून लोकांना आश्चर्य वाटतं. करिश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यात- 'राजा बाबू', 'राजा हिंदुस्तानी', 'कुली नंबर 1', 'बीवी नंबर 1', 'अंदाज अपना अपना' इ. करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गोविंदासोबतची तिची जोडी खूप पसंत केली जाते. मात्र, करिश्माने आता ओटीटीच्या जगातही प्रवेश केला आहे. 2020 मध्ये ती वेब सीरिज 'मेंटलहूड'मध्ये दिसली होती.