मुंबई : एक गोंडस स्मित, सुंदर केस, डोळ्यात चमक... पण ही गोंडस मुलगी आहे तरी कोण? फोटो बघून ओळखणं थोडं अवघड आहे. पण जर तुम्हाला हिंट दिली तर? ही मुलगी आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. या मुलीचं फॅनफॉलोईंग बरच मोठं आहे. ही मुलगी सौंदर्याच्या बाबतीत आणि तिच्या स्टाइलच्या बाबतीत  सगळ्यांना टक्कर देते. आता तरी तुम्ही ओळखू शकता का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या कोण आहे ही सुंदरी
तुम्ही अजूनही ओळखले नसेल तर, चला तुम्हाला आणखी एक हिंट देतो. सध्या ही अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत खूप हिरोपंती करत आहे. आता कदाचित तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाही. होय... ही तारा सुतारिया आहे. फोटो पाहिल्यानंतर विश्वास ठेवणं थोडे कठीण असलं तरी ती तारा आहे आणि ताराने टीव्ही रिअॅलिटी शो 'एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा' मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तेव्हाचा हा फोटो आहे.


11 वर्षे जुना आहे हा फोटो
हा फोटो 2011 चा आहे जेव्हा तारा सुतारियाने या शोमध्ये भाग घेतला होता. यावेळी अनु मलिक आणि फराह खान शो जज करत होते. त्यानंतर तारा सुतारिया हिने सर्वोत्कृष्ट नृत्य आणि गायनाचं कौशल्य जजना दाखवलं. या अतिशय सुंदर फ्रॉकमध्ये तारा एखाद्या बाहुलीसारखी दिसतेय. ताराचा हा फोटो पाहून कदाचित कुणीही कल्पना केली नसेल की, तारा एके दिवशी इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट नायिका बनेल.