अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी लिहिलेलं ‘ते’ पत्र १२वीच्या पुस्तकात
गुजरात शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखेतील १२वीचे विद्यार्थी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या संदर्भातील एका पत्राचा अभ्यास करत आहेत. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडिल प्रकाश पदुकोण यांनी आपली मुलगी दीपिका आणि अनिषा यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. गुजरात शिक्षण विभागाने हे पत्र कॉमर्सच्या पुस्तकात युनिट चारमध्ये छापलं आहे. या पत्राच्या माध्यमातून फॅमिली बॉंडिंग आणि ह्युमन वॅल्यूजचे महत्त्व समजावले आहे.
या पत्राच्या माध्यमातून माजी बॅडमिंटन प्लेयर प्रकाश पादुकोण यांनी स्वत:च्या आयुष्यातील अनुभव शेअर केले आहेत. प्रकाश पादुकोण यांनी त्यांचा दृष्टिकोनही मांडला आहे. पाहूयात या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.
प्रिय दीपिका आणि अनिषा,
तुम्ही दोघी अशा एका वळणावर आहात जेथून तुमचं आयुष्य सुरु होतं. मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगू इच्छितो ज्यांनी मला आयुष्यात खुप काही शिकवलं आहे. काही वर्षांपूर्वी बंगळुरुमध्ये एका लहानशा मुलाने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी कुठलंही स्टेडियम नव्हतं आणि कुठलंही बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध नव्हत जेथे जाऊन ट्रनिंग घेता येत होती.
माझं बॅटमिंटन कोर्ट घरापासून जवळच होतं. मी त्याच ठिकाणी खेळण्यास शिकलो. आम्ही दररोज विचार करत होतो की आज हॉलमध्ये काही प्रोग्राम तर नाही ना? ज्यावेळी हॉलमध्ये प्रोग्राम नसे त्यावेळी आम्ही शाळेतून थेट हॉलमध्ये जात होतो.
(Image Courtesy: AajTak)
यासोबतच माझ्या लहानपणी आणखीन एक खास गोष्ट होती आणि ती म्हणजे मी कुठलीही वस्तू नसल्याची तक्रार केली नाही. आठवड्यातून काही वेळ खेळण्यास मिळत असे याच गोष्टीत मी आनंदीत राहत असे. माझं करिअर आणि आयुष्य यांची मी कधीही तक्रार केली नाही आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला शिकवू इच्छितो की, तुम्ही मेहनत, जिद्दीने आयुष्यात पूढे जा.
दीपिका ज्यावेळी तु १८ वर्षींची असताना म्हटले होते की, तुला मुंबई जाऊन मॉडलिंग करायचं आहे त्यावेळी आम्ही विचार केला की, तु इतक्या मोठ्या शहरात आणि इंडस्ट्रीत कशी राहशील. तुला कुठलाही अनुभवही नाहीये. पण, आम्ही निर्णय घेतला की तुला तुझ्या मनासारखं करुन द्यायला हवं.
(Image Courtesy: AajTak)
कारण, आम्हाला वाटत होतं की ज्या सहवासात तू वाढली त्यानंतर तुला तुझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी न देणं हे चुकीचं आहे. तु यशस्वी झाली असती तर आम्हाला गर्व झाला असता आणि तुला यश आलं नसतं तर आम्हाला वाईट वाटलं नसतं कारण, तु प्रयत्न केला होता.
लक्षात ठेवा मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे की, आपली वाट कशी निवडावी. आपल्या आई-वडिलांच्या मदतीशिवाय तुम्ही तुमचं धेय्य गाठू शकता.