मुंबई: अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच देशभरात फार चर्चेत आहे. 9 फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमाचा जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर संपन्न झला. प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. हा सिनेमा भारतात वेलेंटाइन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी राजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रणवीर आणि आलियाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सिनेमात रणवीर एका स्ट्रिट रॅपरच्या भूमिकेत दिसणार असून आलिया मुस्लिम मुलीची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा गरिब मुलांना समाजात त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जातात आणि कशा प्रकारे प्रकाश झोतात येतात. गरिब वस्तीत राहणाऱ्या मुलांचे वास्तव सिनेमाच्या मध्यमातून जगासमोर येणार आहे.



चाहत्यांनी दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या कामाला विशेष दाद दिली आहे. 'गली बॉय' सिनेमाला प्रमोट करण्यासाठी दिग्दर्शक झोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी, रणवीर सिंग, आलिया भट्ट बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित होते.