मुंबई : १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'ला प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय'ने बॉक्सऑफिसवर शंभरी कोटींचा गल्ला पार केला आहे. 'गली बॉय'ने चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बम्पर ओपनिंग करत प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी १०० करोड क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी १९.४० करोड कमाई केली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी १३.१० करोड, शनिवारी १८.६५ करोडची कमाई झाली. सोमवारी ८.६५, मंगळवारी ८.०५, बुधवारी ६.०५ इतकी कमाई झाली. चित्रपट प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी गुरूवारी ५.१० करोड रूपयांचा गल्ला जमवत 'गली बॉय'ने १००.३० करोड रूपयांमध्ये एन्ट्री केली आहे.



'गली बॉय' चित्रपट जोया अख्तरने दिग्दर्शित केला असून जोयाच्या करियरमधील सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. जोयाच्या 'दिल धडकने दो' चित्रपटाने ७६.८८ तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ने ९०.२७ करोडचा गल्ला जमवला होता. 'गली बॉय'ने केवळ आठ दिवसांतच शंभरी गाठून आधीच्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. रणवीरचा शंभर करोड पार करणारा 'गली बॉय' सलग तिसरा चित्रपट ठरला आहे. प्रत्येक  चित्रपटातून रणवीरने साकारलेल्या सर्वच भूमिकांना न्याय दिला आहे.