३ दशके सुपरहिट गाणी देणारा गुरुदास मानला तोड नाही
गुरूदास मान यांच्या वाढदिवसानिमित्त काही गाण्यांची सफर करुया..
मुंबई : १९८० मध्ये आंतर महाविद्यालयीन फेस्टिवलमध्ये गाणाऱ्या एका तरुणाला दुरदर्शनसाठी गाण्याची संधी मिळाली. गाण्याचे बोल होते, 'दिल दा मामला है..' तस पाहायला गेल तर मनाला भावतील असे शब्द नव्हतेच.
पण हे गाण सुपरहिट करून गुरदास मान यांनी मागे वळून पाहिल नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही गाण्यांची सफर करुया..
बघता बघता गुरूदास स्टार बनले. लाईव्ह परफॉर्मन्स असो किंवा कोणता वेगळा समारंभ असो, गुरूदास यांची विनम्रता सारखीच असायची.
गेल्या तीन दशकात कित्येक पंजाबी गायक आले आणि गेले. पण गुरूदास मान यांची लोकप्रियता कमी झाली नाही.
'लॉन्ग द लश्कारा' हे असे एक गाणे ज्याशिवाय पंजाबी गाण्याच्या सिलसिला पूर्ण होऊ शकत नाही.
गुरूदास मान आणि दिलजीत दोसांझ यांची कोक स्टुडिओतील जुगलबंदीही लाजवाब आहे.