मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हर्षाली मल्होत्रा  (Haarshali malhotra) सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच तिच्यातील आणखी कला जगासमोर आली आहे. सध्या जगभरात कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड नको म्हणून ऑनलाईल शाळा भरत आहे. ऑनलाईन शाळा मात्र  हर्षालीला आवडली नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिने एक फोटो पोस्ट करत शाळेतील आठवणी ताज्या केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ती पोस्ट करत म्हणाली 'आधी शाळेत जात होतो. तेव्हा मजा येत होती.  आता शाळेत जावू शकत नाही, म्हणून शिक्षा मिळत आहे, आधी सगळं कळतं होतं, पण आता नाही.. केव्हा शाळा पुन्हा सुरू होणार हे देवालाचं ठावूक...' असं हर्षाली म्हणाली आहे.


दरम्यान, कोरोनाचा वाढता कहर पाहाता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात विनापरीक्षा जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा हर्षाली देखील आता आठवीच्या वर्गात गेली आहे. असं देखील तिने पोस्टमध्येम्हटलं आहे. सध्या हर्षालीची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.