`चला हवा येऊ द्या`च्या मंचावर हॅम्लेट सादर
मालिका, चित्रपटनिर्मितीनंतर आता झी मराठी नाटकक्षेत्रात उतरतेय.
मुंबई : मालिका, चित्रपटनिर्मितीनंतर आता झी मराठी नाटकक्षेत्रात उतरतेय. झी मराठीची निर्मिती असलेल्या शेक्सपियरची अजरामर कलाकृती "हॅम्लेट" या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या नाटकाच्या यशाच्या निमित्ताने हॅम्लेटची संपूर्ण टीम चला हवा येऊ द्याच्या मंचावर आली होती. हॅम्लेटची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली म्हणजे काहीतरी धमाल स्किट सादर होणार हे ठरलेलेच. या मंचावरही हॅम्लेट नाटक सादर कऱण्यात आले. यात हॅम्लेटची भूमिका साकारलीये ती भाऊ कदम. त्याचा जबरदस्त टायमिंग, विनोद फेकण्याच्या कलेमुळे हे स्किट तुम्हाला खळखळून हसवेल हे नक्की. भाऊसह काकाच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि राणीच्या भूमिकेत सागर कारंडेनेही धमाल उडवून दिली.