महान टेनिसपटूंपैकी (tennis) एक असलेल्या रॉजर फेडररने गुरुवारी (Roger Federer) निवृत्तीची घोषणा केली. रॉजर फेडररने ग्रँडस्लॅम (Grand Slam) आणि एटीपी टूरमध्ये खेळण्याच्या संदर्भात निवृत्तीचा निर्णय घेतला. रॉजर फेडररने ट्विट करून आपल्या निवृत्तीबद्दल चाहत्यांना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास मेसेज लिहिले आहेत. दरम्यान, चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हंसल मेहता यांनी रॉजर फेडररच्या जागी चक्क अरबाज खानचा फोटो लावला आहे.


हंसल मेहता यांनी ट्विट करत गोईंग मिस यू चॅम्पियन. #रॉजरफेडरर असं लिहिलं आहे. गंमत म्हणजे हंसल मेहताने आपल्या ट्विटमध्ये रॉजर फेडररऐवजी अरबाज खानचा (arbaaz khan) फोटो टाकला आहे.



हंसल मेहता यांच्या पोस्टवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. मेहता यांनी रॉजर फेडरर असा हॅशटॅग जोडत हे ट्विट केलं आहे. तरीही काही लोकांनी अरबाजला काय झालं आहे अशा कमेंट केल्या आहेत.


रॉजर फेडररने गुरुवारी निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे चाहते भावूक झाले आहेत. दरम्यान, जगभरातील लोक त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अनुष्का शर्मा, लारा दत्ता यांच्यासह अनेकांनी रॉजरसाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. 


दरम्यान, रॉजर फेडरर आणि अरबाज खानचा लूक अगदी सारखाच आहे. त्यांच्या जुळणाऱ्या चेहऱ्यावर यापूर्वीही अनेक मीम्स बनवले गेले आहेत. हंसल मेहतांच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स येत आहेत ज्यामुळे गोंधळ होत आहे. अनेक जण हंसल यांच्या ट्विटचा आनंद घेत आहेत, तर काही लोकांनी याला वाईट विनोदही म्हटले आहे.