मुंबई : टीव्ही मालिका ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा प्रवास करणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीनं (Hansika Motwani) काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. 'शाका लाका बूम बूम' ची छोटी 'करुणा' हंसिकाने नुकताच सोहेल खातुरियाबरोबर (Sohael Khaturiya) साखरपुडा केला. (Hansika Motwani Engagement) साखरपुड्याचे फोटो पाहिल्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. ते दोघं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सप्तपदी घेणार असल्याचे म्हटले आहे. सोहेलनं हंसिकाला पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरसमोर रोमॅंटिक अंदाजात प्रपोज केलं. सोहेलनं प्रपोज करताच हंसिकानं होकार दिला. त्यानंतर हंसिकानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. मात्र, तुम्हाला माहितीये का? ज्या सोहेलसोबत हंसिकाचा साखरपुडा झाला आहे हे त्याचं दुसरं लग्न आहे. याशिवाय हंसिकानं सोहेलच्या पहिल्या लग्नात डान्स केला होता. (Sohael Khaturiya and Hansika Motwani Engagement) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहेलनं हंसिकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी रिंकी बजाजशी पहिलं लग्न केलं होतं. 2016 मध्ये सोहेल आणि रिंकीनं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नात हंसिका मोटवानीदेखील उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत सोहेल आणि रिंकीच्या लग्नाची एक झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत हंसिका डान्स करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Sohael Khaturiya's First Wedding With Rinky Bajaj) 


एकीकडे, सोहेल आणि रिंकू यांचे विभक्त होण्याचे कारण कोणालाही माहित नाही. दुसरीकडे सोहेल आणि हंसिका हे दोघेही बिझनेस पार्टनर असून त्यांची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेल 4 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या लग्नाचे सगळे फंक्शन्स 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. हे रॉयल डेस्टिनेशन वेडिंग जयपूरच्या 450 वर्ष जुन्या किल्ल्यात सप्तपदी घेणार आहे. (Hansika Motwani Had Attended and Danced at Sohael Khaturiya s First Wedding With Rinky Bajaj Video Viral) 


सोहेल आणि रिंकी बजाजच्या लग्नाचा व्हिडीओ पाहा 



एका जुन्या किल्ल्यात होणार आहे. या सोहळ्यात फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सोहेल व हंसिकासह त्यांचे कुटुंबीय सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तिने प्रसिद्ध टीव्ही मालिका 'शाका लाका बूम बूम', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'सोन परी' यासह अनेक शोमध्ये काम केले आहे. ती हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटातही होती. याशिवाय तिने बॉलिवूडमध्ये 'आपका सुरुर', 'मनी है तो हनी है' सारखे अनेक चित्रपट केले आहेत. दरम्यान, ती आता प्रामुख्याने दाक्षिण चित्रपटसृष्टीत काम करत आहे.