Hanuman Actress Varalaxmi Sarathkumar Gets Engaged : दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारनं साखरपुडा केलं आहे. तिनं एक मार्च रोजी कुटुंबाच्या उपस्थितीत आर्ट गॅलरिस्ट निकोलई सचदेवसोबत साखरपुडा केला आहे. दोघं एकमेकांना गेल्या 14 वर्षांपासून ओळखतात. आता घरच्यांसमोर ते एकमेकांचे साथी झाले आहेत. वरलक्ष्मी सरथकुमारनं त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरलक्ष्मी सरथकुमार आणि निकोलाई रोमॅन्टिक पोज देताना दिसले. त्या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत काही फोटो काढले. त्याचे फोटो वरलक्ष्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले. हे फोटो शेअर करत वरलक्ष्मीनं कॅप्शन दिलं की साखरपुडा झाला आहे. प्रेम, आनंदाविषयी काही सांगू शकत नाही. वरलक्ष्मी आणि निकोलाईच्या नव्या आयुष्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना वरलक्ष्मी आणि निकोलाईच्या या निर्णयानं फार आनंद झाला आहे. 



वरलक्ष्मीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर वरलक्ष्मी सरथमुकार लवकरच 'रायन' या चित्रपटात दिसणार आहे. यात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी हनुमानमध्ये ती दिसली होती. ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.


सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री


वरलक्ष्मी सरथकुमार ही दाक्षिणेतील लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वरलक्ष्मी ही अभिनेत्री आणि दिग्दर्शिका राधिका सरथकुमार यांची सावत्र मुलगी आहे. वरलक्ष्मी सरथकुमारनं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या पोड्डा पोडी या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. काही काळात वरलक्ष्मीची लोकप्रियता वाढली आणि ती सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक झाली.


हेही वाचा : दिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप


दरम्यान, वरलक्ष्मीच्या हनुमान या चित्रपटाविषयी बोलायचं झाले तर 20 कोटींमध्ये बणवण्यात आलेल्या या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला.आता त्याच्या दुसरा भाग येणार याची आशा सगळ्यांना आहे. त्याशिवाय तो चित्रपट आणखी काही रेकॉर्ड मोडेल असे अनेक प्रेक्षकांना वाटू लागले आहे. त्याशिवाय हा चित्रपट 1000 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात येईल अशा चर्चा आहेत. त्याचं कारण म्हणजे याच चित्रपटानं बजेट पेक्षा 6 पट जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याची आणि अनेक मोठ्या चित्रपटाची तुलना होऊ लागली होती.