जलेगी तेरे बाप की! मनोज मुंतशिरने या प्रवचनातून कॉपी केला तो डायलॉग?, Video व्हायरल
Adipurush Dialogue: आदिपुरुषमधील वादग्रस्त संवादामुळं चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 600 कोटींचे बजट असलेला हा चित्रपट बॉस्क ऑफिसवर दणकून आपटला आहे. त्यात सोशल मीडियावरही ट्रोल होत आहे.
Adipurush Dialogue Copy: आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादावरुन दिग्दर्शक आणि लेखकावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच यातील वादग्रस्त डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देवतांच्या तोंडी असे छपरी डायलॉग दिल्यामुळं लेखकांवर समीक्षकांसह प्रेक्षकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक संत प्रवचनात अशाच प्रकारचे संवाद बोलताना दिसत आहेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी लेखक मनोज मुंतशीर यांने याच प्रवचानातून डायलॉग चोरी केल्याचा आरोप केला आहे.
चित्रपटातील एका दृष्यात हनुमान आणि मेघनाथ यांचा संवाद आहे. यात 'कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की....'' असा एक संवाद आहे. या संवादावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तसंच, वाढत्या विरोधानंतर चित्रपटातील हा डायलॉग बदलण्यात आला आहे. तसंच, पटकथाकार व संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी जाहीर माफी मागितली. त्याचबरोबर, असे संवाद लिहण्यामागचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
बजरंग बली हनुमान आणि मेघनाथ यांच्यातील जे संवाद आहेत ते काही मी स्वतः तयार केलेली वाक्य नाहीयेत. किंवा मी विचार असताना माझ्या डोक्यात आली. अशीच वाक्ये देशातील मोठ्या-मोठ्या कथावाचकांनी त्यांच्या प्रवचनात म्हटली आहेत. हवं असल्यास मी व्हिडिओ दाखवू शकतो, असं स्पष्टीकरण मनोज मुंतशीर यांनी दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका प्रवचनात एक संत अशाच प्रकारचे वक्तव्य करत असल्याचे दिसतंय.
संताच्या प्रवचनाचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा आदिपुरुषला ट्रोल केलं आहे. याच प्रवचनातून चित्रपटाचे डायलॉग कॉपी केले आहेत. ISKCON DWARKAच्या ऑफिशिअल युट्यूब चॅनलवर 8 महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ व्हायरल अपलोड करण्यात आला आहे. अमोघ लीला दास असं त्या संताचे नाव आहे. तर, ते इस्कॉन द्वारकाचे उपाध्यक्ष असून मोटिवेशनल स्पीकर आहेत.
जेव्हा हनुमानाच्या शेपटीला आग लावण्यात आली होती. ती कथा सांगताना ते म्हणतात की, 'घी किसका, रावण का, कपडा किसका? रावण का, आग किसकी? रावण की, जली किसकी? रावण की'. अमोघ लीला दास यांनी लंका दहनाचे वर्णन करताना पुढे म्हटलं आहे की, भगवान हनुमान हे बेस्ट मॅनेजर होते. त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय लंका दहन केली. म्हणजेच आग लावण्यसाठी तूप, कपडा आणि आग सर्वकाही रावणाचेच होते.