मुंबई : सध्या हनुमान सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. तेज सज्जा फेम अभिनेत्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाचं बजेट फारसं नसतानाही या सिनेमातील ईफेक्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या अयोध्यामध्ये राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना हनुमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि हा सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. भगवान हनुमानाच्या शक्तीने इन्स्पायर एक हिरोची ही कहाणीला प्रेक्षक खूप पसंती देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या शुक्रवारी हनुमान बऱ्याच मोठ्या सिनेमांच्या गर्दीत थिएटरमध्ये पोहचला. प्रशांत वर्मा दिग्दर्शित पॅन इंडिया सिनेमासोबतच जिथे साऊथमध्ये महेश बाबू आणि धनूषसारख्या स्टार्सचा सिनेमा रिलीज झाला. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट यासोबतच रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्सिऑफिसवर अयशस्वी ठरला आहे. 


एका आठवड्यात केली जबरदस्त कमाई
रिपोर्टनुसार हनुमान सिनेमा  30 करोडच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे. मात्र वर्ल्डवाइल्ड बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे.  ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयने यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार 'हनुमान'ने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हनुमान ज्याप्रकारचा सिनेमा आहे. त्या हिशोबाने हे कलेक्शन सिनेमासाठी खूप जास्त आहे.


फक्त  भारताच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर,  'हनुमान'ने बॉक्स ऑफिसवर  पहिल्याच आठवड्यात 90 करोड रुपये इतकं कलेक्शन केलं आहे. गुरुवारी चित्रपटाने भारतात ९.५ कोटी रुपयांची कमाई केली. आज म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाची कमाई किती होतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


हिंदीमध्ये देखील दमदार कलेक्शन  
हनुमानच्या हिंदी वर्जनने काहीच खास प्रमोशन केलं नाही.  अभिनेता तेज सज्जाने आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, दिल्ली-मुंबईमध्ये प्रमोशनल इवेंट्स मध्ये काय करणार. लोकं त्यांचा चेहरा ओळखतच नाहीत. मात्र हिंदीत हनुमान जनतेला इतकं आकर्षित करत आहे की, आता हनुमान हा चेहऱ्याला तेज सजा या नावाने ओळखू लागले.


हनुमान सिनेमाने हिंदी वर्जनमध्ये ७ दिवसांत 22.5 कोटींची कमाई केली आहे. एवढंच नव्हेतर या सिनेमाने कांतारा सिनेमाला मागे टाकलं आहे.  ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने हिंदी रिलीजच्या पहिल्या 7 दिवसात 15 कोटी रुपयांची कमाई केली होती.  'हनुमान' ज्या पद्धतीने हिट होत आहे, त्यावरून लवकरच हिंदीत 50 कोटींची कमाई होणार आहे.