मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) टॉलीवुड इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. अल्लूचा चाहता वर्ग देखील जास्त आहे. लाखो हृदयाची धडकन म्हणून अल्लू अर्जुन मनात आहे पण त्याच्या मनात मात्र फक्त एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे स्नेहा रेड्डी (Sneha Reddy). स्नेहा आणि अर्जुनची जोडी परफेक्ट असल्याचं समजलं जातं. आज अल्लू अर्जुनचा वाढदिवस या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी ....


अशी झाली पहिली भेट 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुन आणि स्नेहाची पहिली भेट ही अमेरिकेत एका मित्राच्या लग्नात झाली. स्नेहाला माहित होतं की अल्लू अर्जुन एक अभिनेता आहे पण तिने त्याचे सिनेमे पाहिले नव्हते. दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना आपलं हृदय दिलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. बोलण्यातून एकमेकांची मैत्री झाले आणि हळू हळू प्रेमाच रुपांतर प्रेमात झालं. 


कोण आहे स्नेहा?



स्नेहा हैदराबादच्या एका नामांकित व्यायसायिकाची मुलगी आहे. स्नेहा आणि अल्लूने काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अल्लूने आपल्या वडिलांना स्नेहाच्या घरी लग्नासाठी बोलणं करायला पाठवलं. तसं ते गेले देखील पण स्नेहाच्या वडिलांनी या लग्नासाठी होकार दिला नाही. 


दोघांनी एकमेकांसोबत एकत्र राहण्याचा घेतला निर्णय 



स्नेहाच्या वडिलांनी विरोध जरी केला तरी स्नेहा-अल्लू यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी स्नेहाच्या कुटुंबियांना तयार करण्याचा निर्णय घेतला. अखेर ते विजयी झालेच. त्यानंतर दोघांनी 6 मार्च 2011 मध्ये लग्न केलं. स्नेहा एंटरटेनमेंट क्षेत्रातील नसून ती अल्लू अर्जुनला सपोर्ट करत असते.