मुंबई : वयाची सत्तरी पार करूनही तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवणारा आणि या शतकातील महानायक अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता बीग बी अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) ७५वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त या शेहेनशाहाने ट्विटरच्या माध्यमातून छायाचित्रे शेअर करत यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या ट्विटर हॅंडलवरून बच्चन लिहीतात 'कोणतेही कष्ट न घेता श्वासही घेतला जात नाही.' हा मंत्र सांगतानाच त्यांनी आपली हटके अशी तीन छायाचित्रे शेअर केली आहेत. तर, इतर ट्विटरमध्ये लिहीले आहे की, 'नियतीने मला आणखी एक वर्ष दिले आहे. श्वास घेण्यासाठी. नियतीचा निर्णय, आशीर्वाद. श्वास तर मला घ्यावाच लागेल.' १९४२ मध्ये अलाहाबादमध्ये जन्मलेल्या बच्चन यांनी आगोदरच जाहीर केले आहे की, या वेळी आपण आपला वाढदिवस साजरा करणार नाही. या वर्षी आपण प्रवासात असल्यामुळे आपण दिवाळीही साजरी करणार नाही, असेही बच्चन यांनी या आधीच म्हटले आहे. बॉलिवूडच्या पडद्यावरचा मोठा काळा अमिताभ यांनी पाहिला आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचे चाहते आहेत.




अमिताभ सध्या आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. विशेष असे की, ते पहिल्यांदाच आमिर खान सोबत काम करत आहेत. यशराज बॅनरखाली प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णा आचार्य करत आहेत. काही दिवासंपूर्वीच या चित्रपटातील लूकचे आमिरखानचे फोटोही लिक झाले होते. प्राप्त माहितीनुसार हे लूक लिक झाल्यावर आमिर भलताच नाराज होता. पण, त्यानंतर काही दिवसांनी बच्चन यांच्या लूकचेही फोटो लिक झाले होते.