मुंबई : बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्याचा एक भूतकाळ असतो. ज्याच्याशी दोन हात करून आज अनेक कलाकारांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यातीलच एक कलाकार आहे राजकुमार राव... आपल्या वेगवेगळ्या सिनेमांमधून राजकुमार रावने स्वतःला सिद्ध केलं आहे की, तो एक उत्तम कलाकार आहे. 'सिटीलाइट्स' 'शादी में जरूर आना' आणि 'न्यूटन' सारखे सिनेमे दिलेला राजकुमार राव. 31 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस असतो. 


राजकुमार रावच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) राजकुमार रावचं खरं नाव राजकुमार यादव आहे. त्याचा जन्म 31 ऑगस्ट 1984 साली गुडगावमधील अहीरवाल येथे झाला. त्याने गुडगावच्या ब्लू बैल्स मॉडेल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी तो दिल्लीत पोहोचला आणि तिथेच आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 


2) आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमार रावने फक्त बॉलिवूडमध्ये आपली ओळखच निर्माण केली नाही तर त्याने सर्वोत्कृष्ठ अभिनयाकरता राष्ट्रीय पुरस्कार देखील स्विकारला. 


3) राजकुमार रावला पहिला ब्रेक हा 'लव सेक्स और धोखा' आणि 'रागिनी एमएमएस' सारख्या सिनेमातून केला. मात्र त्याला ओळख मिळाली ती 'काय पो छे' या सिनेमातून. सिनेसृष्टीत पहिल्यांदा त्याला सफलता मिळाली नाही पण त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्याने नावाची स्पेलिंग बदलली आणि Rajkumar Rao च्या जागी Rajkummar Rao अशी स्पेलिंग लिहिण्यास सुरूवात केली. 


4) राजकुमार रावने आतापर्यंत 20 सिनेमांपेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. पण न्यूटन आणि अलीगढ या सिनेमातून त्याने आपलं वेगळं अस्तित्व दाखवलं. राजकुमार राव मुंबईला आला तेव्हा जाहिरातींमध्ये काम करायचा. या जाहिराती देखील 10 व्या नंबरवर असायच्या. महिन्याला 10 हजार रुपये कमावयचा पण तरी देखील जेवणासाठी मित्रांवर अवलंबून असायचा.