मुंबई : आपल्या डान्समुळे देशभरात ओळखली जाणारी शक्ती मोहन आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. शक्तीचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ मध्ये दिल्लीत झाला होता. पण ती लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. शक्तीला आयएएस व्हायचं होतं पण नशीबाने तिला नवीन ओळख दिली आणि आज ती एक यशस्वी कोरिओग्राफर-डान्सर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्ती सध्या अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोज जज करत आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ मधून शक्तीला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती लोकप्रिय झाली ‘धूम ३’मधील ‘कमली’ गाण्यामुळे. या गाण्यासाठी ती असिस्टंट कोरिओग्राफर होती. 



मीडिया रिपोर्टनुसार, शक्तीने तिचं सुरूवातीचं शिक्षण दिल्लीच्या बिरला बालिका विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर तिने मुंबईच्या सेंट झेवियर्समधून कॉलेज केलं. इथे तिने राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. शक्तीला आयएएस व्हायचं होतं. पण नशीबाने तिला डान्सर केलं. 




शक्तीने डान्स इंडिया डान्स सीझन २ मध्ये विजयी होऊन हे दाखवून दिलं की, तिचं स्वप्न आयएएस अधिकारी नाही तर डान्सर व्हायचं आहे. आता गेल्या आठ वर्षांपासून शक्ती एक यशस्वी कोरिओग्राफर झाली आहे.