Happy Birthday Sushmita Sen  : झगमगत्या विश्वातील सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरणं. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (sushmita sen) आयुष्याच देखील अभिनेक सेलिब्रिटी आले, पण त्यांच्यापैकी कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलेलं नाही. सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावलं. सुष्मिताने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. प्रोफेशनल लाईफमध्ये सुश्मिता यशस्वी झाली, मात्र पर्सनल लाईफमध्ये तिला खरा जोडीदार अद्याप मिळू शकला नाही. (Happy Birthday Sushmita Sen)


'या' कोट्यधीशासोबत सुष्मिताचे खास संबंध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम भट्ट (Vikram Bhatt)
मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिता दिग्दर्शकांची पहिली पसंती ठरली होती. तिला अनेक सिनेमांचे ऑफर्स मिळाले. यादरम्यान महेश भट्ट यांनी तिला `दस्तक` या सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमाने सुश्मिताचे फिल्मी करिअर सुरु झाले. यादरम्यान सुश्मिताचे विक्रम भट्टबरोबर अफेअरसुद्धा सुरु झालं. (Sushmita Sen actress affairs)


रणदीप हुड्डा (Randeep Hooda)
रणदीप हुड्डासोबत देखील सुष्मिताचं नाव जोडण्यात आलं. 'कर्मा आणि होली' सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. अनेक पार्ट्यांमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.


मुदस्सर अजीज
दिग्दर्शक मुदस्सर अजीजसोबत सुष्मिताचं नाव जेव्हा जोडण्यात आलं तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या नात्याची चर्चा होती. 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'दुल्हा मिल गया' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्याचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.


संजय नारंग (Sanjay Narang)
सुश्मिताच्या अफेअर्सच्या लिस्टमध्ये दुसरं नाव संजय नारंग (Sanjay Narang)  असं आहे. संजय नागर एक हॉटेल व्यवसायीक आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 


रोहमन शॉल (Rohman Shawl)
सध्या सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत आहे. दोघांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. रोहमन शॉल सुष्मातापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. महत्त्वाचं म्हणजे सुष्मिता दोन मुली आणि रोहमन शॉलसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे. 


ललित मोदी (Lalit Modi) 
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगली होती. ललित मोदीने सुष्मितासोबतचे काही खासगी फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केलं होते. ललित मोदीसोबत सुष्मिताचं नाव जोडण्यात आलं होतं.