लेकाला आई-बाबा दोघांचं प्रेम देणारा Tusshar Kapoor आजही अविवाहित, कारण...
`मी स्वतःला कोणासोबत शेअर...`, `या` कारणामुळे तुषार कपूर कधीच करणार नाही लग्न
Happy Birthday Tusshar Kapoor : आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी सरोगसीच्या मदतीने पालकत्व स्वीकारलं. पण अभिनेता तुषार कपूर आणि एकता कपूरने सरोगसीच्या मध्यमातून बाळाला जन्म तर दिला, पण कधी लग्न केलं नाही. आजही सर्व काही असताना तुषार आणि एकता त्यांच्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगतात. अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) हा सिंगल फादर आहे. सरोगसीच्या (tusshar kapoor son surrogacy) मदतीने तुषार लक्ष्यचा बाबा झाला आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. (tusshar kapoor son)
तुषारने आपण कधीच लग्न करणार नसल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत तुषारने आपण सिंगलच आनंदी असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात लग्न करण्याचा त्याचा कोणताही प्लान नाही. तुषार म्हणतो,'मी स्वतःला कुणा इतर व्यक्तीसोबत शेअर करू शकत नाही. भविष्यात कधीच लग्न करणार नाही' असं देखील अभिनेता म्हणाला. (tusshar kapoor family)
तुषार कपूर 2016 साली लक्ष्यचा बाबा झाला (tusshar kapoor son laksshya). तेव्हापासून तो एकटाच लक्ष्यचा सांभाळ करत आहे. तसेच एकता कपूर देखील सिंगल मदर आहे. ती देखील तिचा मुलगा रवी कपूरचा एकट्याने सांभाळ करत आहे. तुषारने घेतलेल्या या निर्णयावर तो ठाम आहे. भविष्यात तुषार कधी लग्न करेल का असं विचारल्यावर 'कधीच नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.' असं उत्तर दिलं. (tusshar kapoor with son)
पुढे अभिनेता म्हणाला, 'माझा दिवस कसा संपतो हे कळतही नाही. माझ्या निर्णयबाबत जर मी शाशंक असतो तर मी सिंगर पालक होण्याच्या प्रक्रियेतून कधीच गेलो नसतो. मी हा निर्णय अशावेळी घेतला जेव्हा मी पूर्णपणे हे स्वीकारण्यास तयार होतो.' (tusshar kapoor net worth)
'मी योग्य निर्णय घेतला आहे. आजही माझ्याकडे एवढं काम आहे की, माझा दिवस कसा जातो? कळतंच नाही. ' दिवसभर मी इतका बिझी असतो की मला यामध्ये कुणाचा अडथळा नको. मी भविष्यातही स्वतःला कुणासोबत शेअर करू इच्छित नाही. असं देखील तुषार कपूर म्हणाला.