Happy Birthday Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची पत्नी, ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस. सेलिब्रिटी वाईफ, अशी ओळख असण्यापूर्वी ट्विंकलनं एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख तयार केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील (Bollywood) पहिलेवहिले सुपरस्टार, राजेश खन्ना यांच्या या लेकिनं आयुष्याच्या एका वळणावर आपल्या वैवाहिक नात्याला केंद्रस्थानी ठेवत कुटुंबाला प्राधान्य दिलं. इतकंच नव्हे, तर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीवरही पाणी सोडलं. पण, ज्या नात्यासाठी ट्विंकलनं इतका मोठा त्याग केला, त्याच नात्यात तिचा विश्वासघात होता होता राहिला. 


अक्षयचं Extra Marital Affair?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) यांचं नातं आणि त्यांच्यामध्ये असणारी जवळीक एका प्रसंगी बॉलिवूडमध्ये Talk Of the town ठरली. 'अंदाज', 'ऐतराज' आणि 'वक्त' या चित्रपटांमधून या दोघांनी स्क्रीन शेअर केली. सूत्रांच्या माहितीनुसार 2003 मध्ये 'अंदाज' या चित्रपटाच्या चित्रीकरणापासून अक्षय आणि प्रियांकाचं नातं वेगळ्या वळणावर पोहोचलं आणि त्यांची जवळीक अनेकांच्याच लक्षात येऊ लागली. (Akshay Kumar Extra Marital Affair)


अक्षयच्या पत्नीला याचा सुगावा लागला आणि... 


संपूर्ण कलाजगतामध्ये याच नात्याविषयी बोललं जाऊ लागलं होतं. ज्यावेळी अक्षयच्या पत्नीपर्यंत ही माहिती पोहोचली तेव्हा तिलाही हादरा बसला. असं म्हणतात की, ट्विंकलनं प्रियांकाला फोन करत आपल्या पतीपासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता. पण, तिच्या या ताकिदीचे फार परिणाम झाले नाहीत, अखेर ट्विंकनं असं पाऊल उचललं ज्याची सर्वदूर चर्चा झाली. 


हेसुद्धा वाचा : कोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna


माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार अक्षय आणि प्रियांकाच्या नात्याविषयी वेडंवाकडं ऐकून एके दिवशी ट्विंकलचा संयम तुटला आणि तिनं टोकाचं पाऊल उचललंय. रागाच्या भरात ती चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि प्रियांकाला शोधू लागली. त्या दिवशी नेमकी प्रियांका सेटवर आली नव्हती. कसंबसं तिथे अक्षयनं ट्विंकलला शांत केलं आणि सेटवरून तिला बाहेर आणलं. असं म्हणतात की हा तोच एक प्रसंग होता जेव्हापासून अक्षय कुमारनं वैवाहिक नात्याखातर प्रियांकापासून दुरावा पत्करला आणि यापुढे तिच्यासोबत कधीच चित्रपट साकारला नाही.