Hardeek Joshi Ukhana: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे राणादा आणि पाठकबाईंच्या पहिल्या मंगळागौरची. पहिली मंगळागौर ही प्रत्येकीसाठीही फार स्पेशल असते. अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांची केमेस्ट्री ही सर्वांनाच आवडते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. काही महिन्यांपुर्वीच त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी त्यांची पहिली मंगळागौरही थाटात साजरी करण्यात आली होती. राणादानं पाठकबाईंसाठी खास उखाणा घेतला आहे. सध्या त्याच्या या उखाण्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. नेहमी नवरीनंच का उखाणा घ्यायचा? यावेळी मात्र नवऱ्यामुलानं उखाणा घेतल्याप्रमाणे नेटकरी हार्दिकचं कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढील पाच वर्षे ही मालिका सलग प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. या मालिकेनं अल्पवधीतच प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मालिकेदरम्यानच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे सुर जुळू लागले होते. त्यातून ही मालिका संपल्यानंतरच त्यांनी काही महिन्यांनी लग्न केले. सध्या मराठी मनोरंजनविश्वातील अशा जोड्या आहेत ज्यांच्या लग्नाची जोरात तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. काहींचे लग्न आटोपले आहे तर काही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. काही दिवसांपुर्वी राणा आणि पाठक बाईंनी जेजुरीला भेट दिली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. आता त्यांच्या मंगळागौरीची चर्चा आहे. 


हेही वाचा : पैसा वसूल सप्टेंबर! सत्य घटनेवर आधारित, बोल्ड अन् सेस्पेन्स-थ्रीलर Webseries


यावेळी मंगळागौरीच्या निमित्तानं अनेक लग्न झालेली जोडपी मंगळागौर साजरी करताना दिसत आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनीही यावेळी आपली पहिली मंगळागौर ही दिमाख्यात साजरी केली आहे. अक्षयानं यावेळी हिरव्या रंगाची भरजरी साडी परिधान केली होती. तिनं अगदी पेशवीण बाईप्रमाणे साजशृंगार केला होता. तर हार्दिकनं यावेळी कुर्ता, पायजमा घातला होता. ते दोघंही या वेशभुषेत फारच छान दिसत होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी हार्दिक जोशीनं भन्नाट उखाणा घेतला आहे. तो म्हणाला की, 'लग्नामध्ये घातल्या आम्ही एकमेकांना वरमाला, अक्षयाचं नाव घेतो झुकेगा नहीं साला'. सध्या त्याच्या या उखाण्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. उपस्थितांनीही त्याच्या या उखाण्याला दाद दिली. तर पाठकबाईही खुश झाल्या होत्या. या व्हिडीओखाली अनेक जणं नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.