मुंबई : झी मराठीची तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे. अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लवकरच लग्न करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता त्यांच्या लग्नाची उत्सूकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. अक्षयाच्या इन्स्टाग्रावरुन आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)


अक्षय देवधर व्हिडिओमध्ये जांभळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. ती हार्दिकचा हात हातात देत चालत आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.



अक्षया आणि हार्दिक यांचा विवाह कधी होणार याबाबत अजून कोणतीही माहिती आली नसली तर देखील त्यांचा विवाह लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.