मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला 'या' मालिकेत राणादा या ही भूमिका साकारुन घरा-घरात पोहचलेला हार्दिक तुफान लोकप्रिय झाला. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर हार्दिकने अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. मात्र तरीही लोकं त्याला आजही राणा दा याच नावाने ओळखतात. त्याचा चालतय की हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की, लोक रोजच्या बोलण्यातही तो वापरु लागले. आता पुन्हा एकदा राणादाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर हार्दिक पुन्हा झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, 'करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार' आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे रिऍलिटी शो आहे की नवी मालिका. आता ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात आता 'हार्दिक जोशी' म्हणताना दिसतोय करणार 'तेव्हा कळणार आता मज्जा येणार' नेमकं काय कळणार आणि काय मज्जा येणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिवाळीचा खुमासदार फराळाची चव जिभेवर रेंगाळत असतांना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा हा कार्यक्रम म्हणजे 'जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे लवकरच आपल्या झी मराठीवर.


'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अगदी त्या दिवसापासून मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. कलाकारांची फौज पाहता अगदी कमी काळातच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यातही एका चेहऱ्याला विशेष ओळख मिळाली. तो चेहरा म्हणजे 'पाठक बाई' आणि राणादा


'तुझ्यात जीव रंगला' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. मालिकेत काम करता करता ही जोडी खरंच एकमेकांच्या प्रेमात पडली. अचानक साखरपुडा करत त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपल्या प्रेमाची कबुली देत अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. सध्या हे कपल परदेशात एकमेकांसोबत आपला क्वालिटी टाईम स्पेंण्ड करत आहे. आता पुन्हा एकदा राणादाला रांगण्या अंदाजात पाहून त्याचे चाहते हा नवाकोरा शो पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे.