Shahid Kapoor : सगळीकडेच गणेश चतुर्थीचा उत्सव सध्या आहे. सगळेच धूमधाममध्ये गणेशोत्सव साजरी करण्यात येत आहे. तर चर्चा ही मुंबईतील सगळ्याच गणपती मंडळांची असली तरी त्यासोबत चर्चा असते ती म्हणजे अंबानी कुटुंबाच्या गणशोत्सवाची. अंबानी कुटुंब पूर्ण थाटामाटत हा सण साजरा करतात. त्यांच्या या कार्यक्रमात संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हजेरी लावते. त्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आहे. शाहिद कपूर आणि पांड्या ब्रदर्समध्ये झालेल्या एका क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबानं गणेश चतुर्थीसाठी एका ग्रॅँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाहरुख खान, नयनतारा, अॅटली कुमार, सलमान खानसारखे अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी शाहिद कपूर देखील कार्यक्रमात दिसला होता. त्याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काल म्हणजेच मंगळवारी रात्री अंबानी कुटुंबाच्या मुंबईतील राहत्या घरी म्हणजे अॅन्टिलियामध्ये सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी शाहिद पापाराझींसाठी पोझ देताना दिसला. पण शाहिद कपूरच्या या व्हिडीओत हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पंखूरी शर्मा आणि इशान किशन हे देखील दिसले. शाहिद फोटो काढत असताना ते चुकून त्याच्या मागे आले आणि पापाराझींसाठी पोज देऊ लागले. शाहिदनं त्यांना पाहिलं आणि त्यानंतर लगेचच तो फ्रेम मधून बाजुला झाला आणि त्यांना फोटो काढण्यास देऊ लागला. या संपूर्ण वेळ ते चौघेही हसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : गळ्यात हार, शेजारी उभा 'तो'...; साई पल्लवीनं गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोचं सत्य अखेर समोर


शाहिद आणि पांड्या ब्रदर्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हे तीन पुरुष आणि ती महिला शाहिदचा फोटो खराब केल्यानंतर ज्या प्रकारे हसत आहेत, हे लज्जास्पद आहे. त्यांनी लगेच बाजूला होऊन शाहिदला फोटो काढणं पूर्ण करू द्यायला हवं होतं. यात त्यांना कसे संस्कार देण्यात आले आहेत ते कळतंय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दुसरी व्यक्ती फोटो काढत असताना त्या फ्रेममध्ये न जाणं याला संस्कार बोलतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'शाहिदचं मन खूप मोठं आहे.' अनेकांनी शाहिदसाठी असलेला आदर वाढला आहे.