मुंबई : फिल्म 'गुंडा' मधून अभिनेता हरीश पटेल एपीआय या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. हरीश मार्वल स्टुडिओजचा सिनेमा Eternals मध्ये काम करणार आहेत. या सिनेमाच्या टीझरमध्ये हरीश आपल्या चाहत्यांना दिसणार आहेत. यानंतर अभिनेता हरीश यांनी स्वतः माहिती दिली आहे. हरीश पटेल 1983 साली सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. आतापर्यंत ते अनेक सिनेमात दिसले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरीश पटेल यांचा जन्म 5 जुलै 1983 मुंबईत झाला. सातवर्षांचे असल्यापासून ते सिनेसृष्टीत काम करत आहेत. हरीश रामायणात महिला आणि पुरूष असं दोघांचं कॅरेक्टर साकारलं आहे. 1983 साली त्यांनी सिनेमात डेब्यू केला. श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' सिनेमातून डेब्यू केलं. 


यानंतर मिस्टर इंडिया, बिल्लू बादशाह, मैंने प्यार किया, शोला आणि शबनम, आंखें और मोहरा सारख्या सिनेमात काम केलं आहे. 1994 ते 2008 पर्यंत हरीश पटेल यांनी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्यासोबत काम केलं. 1995 मध्ये इंडियन नॅशनल थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केली. ते नील कमरा नावाच्या नाटकात दिसले. 


थिएटरमध्ये हरीश पटेलने क्लासिकलसोबतच मॉडर्न भारतीय आणि वेस्टर्न लेखकांच्या नाटकात काम केलं. यामध्ये पिंटर यांच्या The Caretaker, Sartre का No Exit, कामसच्या Cross Purpose, Ionesco च्या The Lesson आणि Mrozek च्या Vatzlav नाटकात सहभागी झाले होते. 2007 मध्ये रफ्ता रफ्ता नावाच्या कॉमेडी नाटकात काम केलं. यामध्ये ते प्रमुख भूमिकेत होते. 


हरीश पटेल आता मार्वलच्या Eternals मध्ये दिसणार आहे. या सिनेमात एंजेलिना जोली, रिचर्ड मॅडैन, कुमैल नान्जियानी, सलमा हायेकसोबत अनेक बॉलिवूडचे स्टार्स असणार आहेत. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 5 नोव्हेंबर 2021 साली हा सिनेमा रिलीज होणार आहे.