मिस युनिव्हर्स हरनाज संधू `या` गंभीर आजाराने त्रस्त
चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षाी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं आहे.
मुंबई : चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षाी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर हरनाजचं नाव जगभर गाजलं. त्याचबरोबर, हरनाज मिस युनिव्हर्स 2021 बनली तेव्हा संपूर्ण देशाने एकत्र हा उत्साह साजरा केला होता.
हरनाजला आजही चाहत्यांचे अपार प्रेम मिळतं. पण मिस युनिव्हर्स 2021 बनल्यानंतर 3 महिन्यांनंतर हरनाजचा हा बदलेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हरनाजचं वजन खूप वाढलं आहे. त्याचबरोबर ती तिच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सध्या बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.
अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, फिटनेस फ्रीक मिस युनिव्हर्स विजेत्या हरनाझचं वजन कमी वेळात इतकं कसं वाढू शकतं? आता लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना हरनाजने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लॅक्मे फॅशन वीक 2022 पासून समोर आलेल्या हरनाझच्या बदललेल्या लूकचे व्हिडिओ आणि फोटोंवरील ट्रोलिंगवर हरनाझने नाराजी व्यक्त केली आहे.तिने एका तिच्या ताज्या मुलाखतीत सांगितलं आहे की, 'मला याची पर्वा नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.
ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना हरनाजने पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'मी माझ्या शरीराचा आदर करते. मला सेलिआक आजार आहे, मला बॉडी शेमिंग आवडत नाही. लोकांना माहित नाही की मला ग्लूटेनची ऍलर्जी आहे. मला स्टिग्मा ब्रेक करायला आवडतं. हरनाजच्या उत्तरावरून हे स्पष्ट झालं आहे की, तिचं वजन अचानक वाढण्याचे कारण सेलिआक आजार आहे.