मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकारांकडे Good News आहे. करीनापाठोपाठ आणखी एका कलाकाराच्या घरी पाळणा हलणार आहे. या कलाकाराने आपल्या सोशल अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायिका हर्षदीप कौर आई झाली (Harshadeep Kaur become mother) आहे. ही बातमी कळताच हर्षदीप कौरचे चाहते खूप (Harshadeep Kaur gave birth to baby boy ) खूष आहेत. तिने ही माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.नवीन वर्षाबरोबर बॉलीवूड सेलिब्रेटीच्या आयुष्यात आनंदाची लाट आली आहे. करीना कपूर खान आई झाल्यानंतर बॉलिवूड गायिका हर्षदीप कौरच्या घरी चिमुकल्याचा आवाज ऐकू येणार आहे. गायक हर्षदीपने मुलाला जन्म दिला आहे. हर्षदीपने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.


ह्रर्षदीपने व्यक्त केला आनंद 



हर्षदीप कौरने आपल्या चाहत्यासोबत एक फोटो शेअर केला. यात हर्षदीप तिचा नवरा मनकीतसोबत दिसत आहे.  फोटो शेअर  करताना लिहिले आहे की, 'मुलगा झाला असून एक रोमांचक प्रवास सुरू झाला आहे.' आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये हर्षदीपने लिहिले की, 'स्वर्गातील एक छोटासा भाग पृथ्वीवर आला आहे आणि आम्ही आई-बाबा झालो आहोत. आमचा ज्युनिअर सिंह आला आहे आणि आम्ही यापेक्षा आनंदी होऊ शकत नाही.'


हर्षदीपने दिला मुलाला जन्म


हर्षदीप कौरने २ मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी मुलाला जन्म दिला. याक्षणी आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. हर्षदीपची आई झाल्याची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत आणि गायकीकेला शुभेच्छा देत आहेत.


हर्षदीपने गायले काही हिट गाणे


हर्षदीप कौर बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. हर्षदीप बॉलिवूडमधील 'कटिया करु' आणि 'दिलबरो' सारख्या गाण्यांसाठी ओळखली जाते. अनेक रिएलिटी शोमध्ये ती जजच्या भूमिकेतही दिसली आहे.


हर्षदीपने मनकीतसोबत केले लग्न


 हर्षदीप कौरने २०१५ मध्ये मनकीत सिंगशी लग्न केले. हर्षदीप ही बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध गायिका आहे आणि तिला सूफी गाण्यांसाठी ओळखले जाते. हर्षदीप कौरने २००८ साली 'जुनून-कुछ कर दिखाने का' हा सिंगिंग शो जिंकला होता.