मुंबई : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. सपनाची अल्बम गाणी नेहमीच चर्चेत असतात. तर सपनाही तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२०मध्ये सपना आई झाली, त्यानंतर तिने या लग्नाचा खुलासा केला पण सपनाने हे लग्न कधी केलं हे तिच्या चाहत्यांना माहित नव्हतं. अखेर सपनाने तिच्या लग्नाची तारीख उघड केली आहे. अलीकडेच सपनाचे इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' हे प्रश्न-उत्तर सत्र चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. ज्यात तिच्या चाहत्यांनी तिला बरेच प्रश्न विचारले.


या दरम्यान एका युजर्सने सपनाला तिच्या लग्नाची तारीख विचारली, ज्यावर तिने 20 जानेवारी 2020 सांगितली. 4 ऑक्टोबरला सपनाने एका मुलाला जन्म दिला होता. त्याबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यापूर्वी सपनाने आपलं लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं, परंतु बाळाच्या जन्मानंतर सपनाने वीर साहूसोबत लग्न झाल्याचं सांगितलं.



त्याचवेळी, 'आस्क मी एनीथिंग'मध्ये एका युजर्सने सपनाला विचारलं की, ती तिच्या नवऱ्याला काय हाक मारते? याला सपनाने प्रत्युत्तर देत सांगितलं की 'पति', या सत्रादरम्यान सपनाने तिच्या चाहत्यांनाही वचन दिलं आहे की, ती लवकरच आपल्या बाळाची ओळख प्रत्येकाशी करुन देईल.