नवी दिल्ली: सपना चौधरीनंतर एकापेक्षा एक हरियाणवी डान्सर्स पुढे येत आहेत. तिच्यानंतर आता स्टेजवर प्रियांका चौधरीनं आग लावली आहे. आपल्या डान्समध्ये तिने सर्वांसमोर बोल्ड इशारे केले आहेत. या डान्सला तिथला लोकांनी प्रतिसाद म्हणून शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या आहेत. सपना चौधरीने स्टेज ते टीव्ही आणि मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास केला होता. प्रियांका अजूनही हळूहळू प्रगती करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका चौधरीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तिने पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये स्टेजवर बोल्ड डान्स केला आहे. तिच्या या डान्सला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तिच्या हातात पैसे आणून दिले आहेत. तिच्या डान्समधील बोल्ड इशारे पाहून प्रेक्षकही हैराण झाले आहेत. 


काही लोक हे बोल्ड इशारे पाहून सोशल मीडियावर चांगलेच संतापले आहेत. काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या डान्सला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चौधरीला स्पर्धा म्हणून आता आर सी उपाध्याय आहे. या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. सपना चौधरी गावांमध्ये होणाऱ्या स्टेज शोमध्ये डान्सही करायची. या डान्समुळे ती लोकप्रिय झाली. तिचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला. सपना चौधरी पाहून सोशल मीडिया क्वीन बनली आणि नंतर तिला रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस मध्ये दिसल्यानंतर तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.