मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित तिच्याच नावाचा सिनेमा बॉलिवूडमध्ये येतोय. या सिनेमातलं 'पिया आ' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात हसीना पारकर हिच्या भूमिकेत श्रद्धा कपूर दिसणार आहे. 'पिया आ' या गाण्यावर इंडो-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री सारा अंजुली थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात दाऊदच्या भूमिका निभावणारा सिद्धार्थ कपूरही दिसतोय. श्रद्धा तिचा भाऊ सिद्धार्थसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करण्रा आहे. 


गायक सुनिधी चौधरी हिच्या आवाजात हे गाणं प्रदर्शित झालंय. सुनिधीनं सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत ते शेअरही केलंय. 


 


हा सिनेमा २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.