मुंबई : इरोटिक थ्रिलर सिनेमाची सीरिज असलेल्या हेट स्टोरी 4 चा ट्रेलर रिलज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि करण वाही लीड रोलमध्ये आहेत. ट्रेलरमध्ये उर्वशी भरपूर हॉट अंदाजात दिसत आहे. टीव्ही स्टार असलेल्या करण वाहीची ही डेब्यू फिल्म आहे. हा सिनेमा 9 मार्च 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


फिल्मचा ट्रेलर पाहिल्यास या सिनेमांत लव, सेक्स आणि धोका या थीमवर आधारित आहे. हा सिनेमा दोन भावांची गोष्ट सांगणार आहे. सिनेमांत उर्वशी एका मॉडेलची भूमिका साकारत आहे. करण फोटोग्राफर असून या दोघांना एकमेकांवर प्रेम असतं. मात्र विवानला देखील उर्वशीवर प्रेम होतं. दोन्ही भावांमध्ये प्रेमावरून वाद सुरू होतो. उर्वशी दोघांसोबतही हॉट सीनमध्ये दिसत आहे. 




2012 मध्ये या सिनेमाचा पहिला भाग आला होता. या सिनेमांत पाऊली डॅम होती तर हेट स्टोरी 2 मध्ये सुरवीन चावला, जय भानुशाली आणि सुशांत सिंह होता. हेट स्टोरी 3 मध्ये शरमन जोशी, करण सिंह ग्रोवर आणि जरीन खान असे होते. आतापर्यंत याचे कोणतेही पार्ट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकले नाहीत.