मुंबई : आज जेठालाल म्हणजेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे अभिनेता दिलीप जोशी यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी, टीव्ही स्टार्सही त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत. आज दिलीप जोशी भलेही प्रसिद्ध टीव्ही अभिनेते झाले असतील. पण एक वेळ अशी आली होती की, त्यांनी चित्रपटांमध्ये सलमान खानच्या नोकराची भूमिका साकारली आहे. दिलीप जोशी यांच्या कारकिर्दीबाबत असं म्हणता येईल की, त्यांनी येथे येण्यासाठी अनेक पापड पेलले आहेत. चला तर मग एक नजर टाकूया त्यांच्या प्रवासावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण केलं
दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या नोकर रामूची भूमिका साकारली होती. 


'हम आपके है कौन'मध्ये सलमान खानसोबत केलं आहे काम 
'मैंने प्यार किया' व्यतिरिक्त दिलीप जोशी यांनी सलमान खानसोबत 'हम आपके है कौन'मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात दिलीप जोशी यांनी माधुरी दीक्षितच्या भावाची भूमिका साकारली होती.


'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता सलमान 
दिलीप जोशींच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये सलमान खान त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याच्या या एपिसोडलाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती.  


एकेकाळी दिलीप जोशीं कमावायचे फक्त 50 रुपये 
दिलीप जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे. या कामासाठी त्यांना एकेकाळी फक्त 50 रुपये मिळायचे. याची माहिती खुद्द अभिनेत्याने 'बॉलिवूड हंगामा'ला दिली होती.